असुरक्षित इंटरनेट कनेक्शनवर कारवाई

January 17, 2009 3:03 PM0 commentsViews: 2

17 जानेवारी मुंबईदहशतवादी हल्ल्यासाठी वायफाय आणि इंटरनेटचा वापर केल्यानंतर राज्य सरकारनं आता यावर कठोर निर्णय घेतला आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस आता खडबडून जागी झाली आहे. वायफाय आणि इंटरनेट कनेक्शन वापरणा-यांची कनेक्शन असुरक्षित असल्यासचं आढळल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येईल. पोलिसांनी वायफाय आणि इंटरनेटचा वापर करणा-यांवर काही कायद्याच्या चौकटी तयार केल्या आहेत. त्या अशा, वायफाय आणि इंटरनेटच्या सुरक्षेसाठी ऑफिसमध्ये बसवण्यात आलेले राऊटर खिडकी-दरवाज्याजवळ न बसवता कार्यालयाच्या आत बसवावेत. वायरलेस राऊटरचा पासवर्ड सुरक्षित ठेवा. जे लॅपटॉप – डेस्कटॉप हा राऊटर वापरतात त्यांचा मॅक ऍड्रेस नोंदलेला असावा. तुमच्या नेटवर्कमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणा-या नव्या आय.डी. चा रेकॉर्ड ठेवा. महत्त्वाच्या फाईल्स, फोल्डर्स, प्रिंटर यांचा वापर काही मर्यादित लोकांपर्यंतच ठेवा. प्रत्येक कॉम्प्युटरला स्वतंत्र आय. पी. ऍड्रेस असावा. डेटा साठवण्याची राऊटरची क्षमता मर्यादित असते. म्हणून सीडी/ डीव्हीडीवर बॅकअप घेत रहा. याबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.व्यंकटेशन सांगतात, आत्तापर्यत 70 ते 80 पोलीस अधिका-यांना प्रशिक्षण दिलं आहे. या सायबर वॉरला प्रतिकार करण्यासाठी भारताची स्वत: ची एक सरकारी सायबर हॅकर टीम असावी असं आयटी तज्ञ डॉ. विजय मुखी यांना वाटतं.सायबर मिलेटरीसारखी एक टीम उभी करून देशाच्या सुरक्षेत वाढ करण्यावर सरकार आणि तज्ज्ञ भर देत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात दहशतवादाला आळा बसेल. सुरक्षेच्या अशा उपाय योजना आखाती देशांनी याआधीच केल्या आहेत. आत्ता त्या आपल्याकडेही लागू होतील.

close