झारखंडमध्ये नक्षली हल्ला, एसपींसह 5 पोलीस शहीद

July 2, 2013 6:26 PM0 commentsViews: 281

naxal attack3302 जुलै : बिहारमध्ये हल्ल्याला महिना उलट नाही तोच पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी झारखंडमध्ये पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला चढवलाय. या हल्ल्यात एस.पी. अमरजीत बलीहन यांच्यासह 5 पोलीस शहीद झाले तर 3 जण जखमी झाले आहे. हा हल्ला काठीकुंडच्या जंगलात झालाय.

बैठकीवरून परतत असताना पाकूरमध्ये एस.पी. अमरजीच बलीह यांच्या ताफ्यावर 50 ते 60 नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला. झारखंडमधला हा पाकूर भाग नक्षलवाद्यांचा गढ मानला जात नाही. त्यामुळेच पोलीस गाफील राहिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बलीहन यांचा ड्रायव्हर आणि तीन सुरक्षा रक्षकांचाही नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय.  घटनास्थळी सीआरपीएफच्या दोन तुकड्या पाकूरला रवाना झाल्या आहेत.

close