मुंबई हल्ल्यानंतर नवी मुंबई पोलीस सतर्क

January 17, 2009 7:36 AM0 commentsViews: 4

17 जानेवारी नवी मुंबईनवी मुंबईत नव्यानं उभारण्यात येणा-या सातव्या जेट्टीचं उदघाटन करण्यात आलं. नव्या मुंबईत सागरी किना-यावर मोठ्या प्रमाणावर उभारण्यात येणा-या जेट्टींचा फायदा फक्त कोळी बांधवानाच होणार नाही. तर पोलिसांना या जेट्टीचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. नवी मुंबईला मोठा सागरी किनारा असल्यामुळे कोळी बांधवाची संख्या मोठी आहे. गुजरात बॉम्ब स्फोटात नवी मुंबईतून ई-मेल पाठवण्यात आली होती. तसंच वाहनंही पुरवण्यात आली होती. यामुळे नवी मुंबईमध्ये सतर्क राहणं गरजेचं आहे. नव्या मुंबईच्या सागरी किना-यावर दाट खारफुटी असल्याने या खारफुटीचा फायदा घेत अतिरेकी कोणत्याही भागातून शहरात प्रवेश करू शकतात. याकरिता कोळी बांधवाची पोलिसांना केली जाणारी मदत महत्त्वाची ठरणार आहे. शासनातर्फे नव्यानं उभारण्यात येणा-या जेट्टीवरून पोलीस आणि कोळी बांधव संयुक्तरित्या सागरी किना-यावर गस्त ठेवणार आहेत. याकरिता कोळी बांधवानाही आपत्कालीन यंत्रणेची माहिती दिली जाणार आहे.याबाबत आमदार मंदा म्हात्रे सांगतात, सद्या सागरी दलात शस्त्र आणि होड्या नाहीत. मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई सुरक्षित नाही. नवी मुंबई आता 5 ते 6 जेट्टी बनवण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा कोळी बांधवाबरोबरच पोलिसांनाही होणार आहे. पोलिसां बरोबरच आता येथे कोळी बांधवही गस्त घालणार आहेत. त्यामुळे तरुण कोळी बांधव पोलिसांकडून प्रशिक्षण देण्यात यावं ही मागणी करत आहेत. परंतु नव्या मुंबईतील या कोळी बांधवांना गावातच प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

close