आणि विद्यार्थ्यांवर भीक मागण्याची पाळी !

July 2, 2013 6:11 PM1 commentViews: 289

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

02 जुलै : मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अल्पसंख्याक योजनेचा निधी परत गेल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. मुस्लिम विद्यार्थ्यांची शाळेत संख्या वाढावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. त्यामुळे काही मुस्लिम विद्यार्थी शाळेकडे वळले. पण अजून योजनेचा पैसे मिळालेच नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी परत बालमजुरीकडे वळलेत, तर काहीजण भीक मागत आहेत.

रोज तीस रुपयांसाठी टिकीया पावच्या गाडीवर काम करणारे फसल अन्सारी आणि अफरोज सय्यद अजीज…दोघांनाही पोलीस अधिकारी व्हायचंय. खरं तर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनेप्रमाणे या दोघांनाही रोज हजेरी भत्ता, वर्षाकाठी दोन गणवेश आणि शिष्यवृत्ती मिळायला हवी…पण तसं होत नाहीये.

पाचवीतली नुसरत तर सरकारच्या अपयशाचं मूर्तिमंत उदाहरणच… शाळा सुटल्यानंतर ती चक्क भीक मागते. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या योजनेचा सोळा कोटीचा निधी परत गेल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालंय. पण अधिकारी ते मान्य करायला तयार नाहीत.

अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी योजना सुरु केल्याचं राजकीय श्रेय सरकार घेतं. पण वस्तुस्थिती काही निराळीच दिसतेय.

  • Gaffar Shaikh

    thanks shidhat to disclose this news

close