मुंबई मॅरेथॉनमध्ये 35,000 धावपटूंचा सहभाग

January 17, 2009 6:00 PM0 commentsViews: 2

17 जानेवारी मुंबई26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मॅरेथॉनच्या माध्यमातून मुंबई सावरत आहे. मुंबईत रविवारी होणा-या मॅरेथॉनची दौडमध्ये जगभरातल्या 35 हजार धावपटूंचा सहभागआहे. मुंबई मॅरेथॉनचं मुख्य आकर्षण असणार आहे ती 2 ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकलेली अमेरिकेची ऍथलीट गेल डेव्हर्स. सहाव्या मुंबई मॅरेथॉनची ती ब्रँड ऍम्बेसिडर आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये पुरूष विभागात यावर्षी सगळ्यांचं लक्ष असेल ते कॅनडाचा आघाडीचा ऍथलीट जॉन केलईवर. गेली 2 वर्षं रुबाबात त्याने ही मॅरेथॉन जिंकलीय आणि यावर्षी त्याचा प्रयत्न आहे तो हॅट ट्रिकचा. यावेळी त्याला तगडं आव्हान असणार आहे इथिओपियाच्या ऍथलीट्सचं आणि त्याच्याच देशाच्या मुनयुटू सिमॉनचं.गेल्यावर्षी एप्रिलमध्ये झालेल्या पॅरिस मॅरेथॉनमध्ये सिमॉनने 2 तास 9 मिनिटांची वेळ दिली होती. त्यामुळे त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असेल.केलई आणि सिमॉन दोघंही मुंबईत दाखल झाले आहेत. जॉन केलईने मुंबईत आल्यावर पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला.मुंबईतली दमट हवा आणि उष्मा हे या मॅरेथॉनचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं केलई म्हणाला.

close