अभिनेते सतीश तारे यांचे निधन

July 3, 2013 4:09 PM5 commentsViews: 3680
'तारा' निखळला

‘तारा’ निखळला

03 जुलै : आपल्या कसदार, विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीचा ‘तारा’ आज अल्पशा आजाराने निखळला. अभिनेते सतीश तारे यांचं आज दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी मुंबईत निधन झालं. मधुमेह आणि गँगरीनच्या आजाराने त्रस्त तारे यांच्यावर जुहू येथील सुजय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालल्यामुळे त्यांना व्हेटिंलटरवर ठेवण्यात आलं. अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

 

सतीश तारे… लवचिक अभिनय, शब्दांवर हुकूमत, आणि अभिनयाचे सगळे पैलू अगदी सहजपणे साकारणारा…सतीश प्रेक्षकांपर्यंत पोचला तो रंगभूमीवरून..’विच्छा माझी पुरी करा’मधला सतीशचा शिपाई खास लक्षात राहिला. ऑल लाइन क्लियर, मोरूची मावशी, वासूची सासू, श्यामची मम्मी,जादू तेरी नजर.. बघता बघता सतीशच्या नाटकांची संख्या वाढतंच गेली. विनोदाचं अचूक टायमिंग शिकावं ते सतीशकडूनच.. आणि सतीशनं प्रेक्षकांना लोटपोट हसवलं ते ‘फू बाई फू’मधून.. प्रत्येक पर्वात सतीश तारेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्यच केलं. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधला त्याचा गंभीर अभिनयही प्रेक्षकांना आवडला. पण सतीशचं रंगभूमीवरचं प्रेम काही कमी झालं नाही. म्हणून त्यानं ‘गोलगोजिरी’ नाटकाची निर्मिती केली. आणि त्याचं ते 100वं नाटक होतं. पण आयुष्याच्या रंगभूमीवरूनच अचानक त्याची झालेली एक्झिट मात्र अनेकांच्या डोळ्यात अश्रू देऊन गेली. IBN लोकमतची सतीश तारेला आदरांजली…

 • Prakash Pachpol

  I express my deep sorrow about the untimely death of Shri Satish Tare who looks like a family member of each house in Maharashtra. Mauli ultimately left us alone in this dramatic world. I pray God let the departed soul rest in peace. My salute to this grate comedian.

 • shahaji

  i am shocked……..Reallyyyyyyyyyy…….

 • VINAYAK

  RIP
  one big salute to Satish sir

 • Dnyanesh

  I realy shocked…he is very commedy actor in marathi movies…one big salute from my all frnd to him…… :-(

 • Swapnil Dalvi

  can’t believe

close