8 कोटी कम्प्युटरना धोका

January 17, 2009 3:17 PM0 commentsViews: 3

17 जानेवारी सध्या कम्प्युटरमध्ये एक असा वायरस शिरलाय की, त्यामुळं अनेकांचं मोठं आर्थिक आणि वैयक्तिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या वायरसमुळे जगभरातल्या 8 कोटी कम्प्युटरना धोका निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा सगळ्यात मोठा वायरस ऍटॅक आहे. डाऊनडुप आणि कॉनफिकर हे व्हायरस तुमच्या कम्प्युटरच्या सुरक्षेतील त्रुटींचा फायदा घेऊन मायक्रोसॉफ्ट विंडो निकामी करतात. तज्ज्ञांच्या मते हा व्हायरस एका लॅपटॉमध्ये धुसला तरी संपूर्ण नेटवर्कमध्ये पसरतो. जरी मायक्रोसॉफ्टनं हा व्हायरस निकामी करणारा उपाय शोधला असला तरी हा व्हायरस अजूनही वेगानं पसरत आहे. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट एवढीच की या व्हायरसं टार्गेट घरगुती कॉम्प्युटर्स नाही, तर कॉर्पोरेट नेटवर्क्स आहेत.

close