मुंबई:एक्सेंज इमारतीची आग आटोक्यात

July 3, 2013 1:11 PM0 commentsViews: 333

MUMBAI FIRE303 जुलै : दक्षिण मुंबईत बॅलार्ड पिअर भागात आग लागली. एक्सेंज बिल्डिंग नावाच्या या हेरिटेज सरकारी इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवतहानी झाली नाही.

 

घटनास्थळी वेळेवर 12 बंब आणि 150 अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतल्यामुळे मोठी हानी ठळली. आता ही आग आटोक्यात आली आहे. या इमारतीत अमली पदार्थविरोधी पथक, जनगणना संचालक, ग्राहक अधिकारी आणि इतर केंद्र सरकारशी संबंधित कार्यालयं आहेत. पावसामुळे शॉट सर्किट होऊन ही आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.

close