रायगडमधल्या 58 विद्यार्थ्यांना विषबाधा

January 18, 2009 8:29 AM0 commentsViews: 2

18 जानेवारी, रायगडश्वेता पवाररायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये एका आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या शाळेत एकूण दीडशे विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी 58 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झालीय. शुक्रवारी रात्रीच्या जेवणानंतर या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली.त्यांना माणगाव येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. हॉस्पिटलमधील तपासणीनंतर त्यांना विषबाधा झाल्याचं लक्षात आलं. ही विषबाधा शीळं अन्न खाल्ल्यानं अथवा जेवणात पाल वा अन्य कीटक पडल्यानं झाली असावी, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. माणगावमधल्या आश्रमशाळेत मुंबई, ठाणे, पुणे, रायगड येथील अतिशय गरीब घरातील विद्यार्थी शिक्षण घेतायत. हॉस्पिटलमधील उपचारानंतर या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत फरक पडला आहे.

close