इशरत जहाँ एन्काउंटर बनावटच

July 3, 2013 5:11 PM2 commentsViews: 1125

Image ishrat_300x255.jpgनवी दिल्ली 03 जुलै : देशभर गाजलेल्या इशरत जहाँ बनावट चकमकी प्रकरणी सीबीआयने आज पहिलं आरोपपत्र सादर केलंय. या आरोपपत्रातले काही महत्त्वाचे मुद्दे सीएनएन आयबीएनच्या हाती लागले आहेत. गुजरात पोलिसांनी कट रचून इशरत आणि इतर तीन तरुणांची हत्या केल्याचं या आरोपपत्रात म्हटल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तसंच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे सरचिटणीस अमित शहा यांच्याविरोधात ठोस पुरावे न मिळाल्यानं या टप्प्यात त्यांचं नाव आरोपपत्रात नाही.

 

गुप्तचर विभागाचे स्पेशल डिरेक्टर राजिंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीवरूनच ही चकमक झाल्याचा आरोप आहे. पण, सीबीआयच्या पहिल्या आरोपपत्रात त्यांच्या नावाचाही समावेश नाही. 15 जून 2004 ला अहमदाबाद-गांधीनगर रस्त्यावर एका निर्जन ठिकाणी गुजरात पोलिसांनी केलेल्या चकमकीत 19 वर्षांची इशरत आणि तिच्याबरोबर असलेल्या 3 तरुणांचा मृत्यू झाला होता.

 

इशरत ही लष्कर-ए-तोएबा या अतिरेकी संघटनेची सदस्य आहे आणि नरेंद्र मोदींची हत्या करण्यासाठी तिला पाठवण्यात आल्याच्या संशयावरून ही चकमक करण्यात आली होती. पण, सर्वात आधी गुजरातच्या मेट्रोपोलिटन कोर्टाने ही चकमक बनावट असल्याचा निकाल दिला. त्यानंतर गुजरात हायकोर्टाच्या आदेशावरून आधी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम म्हणजे एसआयटी आणि त्यानंतर सीबीआयाने या प्रकरणी तपास केला. इशरत आणि लष्कर-ए-तोयबाचा काहीही संबंध या दोन्ही तपास संस्थाना आढळला नाही.
सीबीआयच्या या आरोपपत्रातले महत्त्वाचे सवाल

 • 19 वर्षांची इशरत जहाँ अतिरेकी होती का?
 • इशरत बरोबर असलेले तीन मुलं अतिरेकी होते का?
 • इशरत 11 जून 2004ला महाराष्ट्रात होती. तिचा गुजरातशी काहीही संबंध नसताना अचानक 15 जून रोजी ती गुजरातमध्ये कशी पोचली?
 • गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांना इशरतच्या चकमकीबाबत माहिती होती का?
 • इशरत आणि इतर तिघांना पोलिसांनी आधी अटक केली आणि नंतर कट रचून त्यांची हत्या करण्यात आली का?

 

आरोपी पोलीस अधिकारी

 • पी. पी. पांडे, एडीजीपी
 • डी. जी. वंझारा, डीआयजी
 • जी. एल. सिंघल, एसीपी
 • तरूण बारोट, डेप्युटी एसपी
 • एन. के. अमीन, डेप्युटी एसपी
 • अंजू चौधरी, एसआरपी कमांडो
 • Milind Ramesh Khot

  पंतप्रधान पदाचा उमेदवार?

  इशरत अतिरेकी, दहशतवादी वा जिहादी नव्हती. मग कोण होती इशरत जहान? बहुधा ती सेक्युलर गोतावळ्याची पंतप्रधान पदाची उमेदवारच असावी. नाहीतर मुंबईनजिकच्या मुंब्रा उपनगरातल्या एका सामान्य कुटुंबातील नगण्य तरूणीला गुजरातचा मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्य पोलिस, आयबी, इतक्या मोठमोठ्या लोकांनी कारस्थान शिजवून खोट्या चकमकीत मारण्याचा काय दुसरा हेतू असू शकेल? फ़ौजदारी कायदा व न्यायप्रक्रियेत कुठल्याही गुन्ह्यासाठी हेतू (Motive) निर्णायक महत्वाचा मानला जातो. इशरतच्या हत्येसाठी अन्य कुठला हेतू कुणाला माहित आहे काय?गुजरात मधील इशरत जहान एन्काउन्टर मधील एक आय. पि. एस. ऑफिसर श्री. पी. पि. पांडे यांच्यासहित पूर्ण टीम वरील खटल्याची आज तारीख आहे.

  मुंब्र्यातील कॉलेज तरुणी इशरत जहाँ ही ‘लश्कर-ए-तोयबा’साठीच काम करत होती तसेच तिच्यासह जे चार अतिरेकी चकमकीत मारले गेले, त्यांचा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाच ठार मारण्याचा कट होता, असे खळबळजनक सत्य आयबीने सीबीआयला लिहिलेल्या एका ताज्या पत्राने समोर आले आहे. ‘आजतक’ या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.
  सविस्तर बातमी येथे वाचू शकता,
  http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Ishrat-Jahan-encounter-gujrat/articleshow/20586228.cms

  नक्की सरकारला काय सिद्ध करायचे आहे??

 • Ashutosh

  असं सीबीआय म्हणतेय. न्यायालयात सिद्ध झालेले नाही. तुम्ही आपली अक्कल चालवून न्यायालयाने निर्णय दिल्यासारखी बातमी का देताय?

close