कसाबच्या सुरक्षेची जयंत पाटलांची ग्वाही

January 18, 2009 8:57 AM0 commentsViews: 1

18 जानेवारी, मुंबईमुंबईवरील हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाबच्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेण्यात येत असल्याचं गृहमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ऑर्थर रोडमध्ये,कसाबच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात येत होत. ऑर्थर रोड तुरुंगात अनेक हाय प्रोफाईल गुंड आहेत.त्याच्यांपासून कसाबला धोका असल्याचं सांगण्यात येत होत.मुंबई हल्ल्याच्या तपासात कसाब महत्वाचा दुवा आहे.त्यामुळं त्याच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घेण्यात येत असल्याची ग्वाही गृहमंत्र्यांनी दिलीये. कसाबच्या सुरक्षेवर या खटल्यासाठी खास कोर्ट असल्यानं निकाल लवकर लागेल असंही ते म्हणाले.

close