आठवणीतले सतीश तारे

July 3, 2013 7:18 PM0 commentsViews: 1088

सतीश तारे… लवचिक अभिनय, शब्दांवर हुकूमत, आणि अभिनयाचे सगळे पैलू अगदी सहजपणे साकारणारा…सतीश प्रेक्षकांपर्यंत पोचला तो रंगभूमीवरून..’विच्छा माझी पुरी करा’मधला सतीशचा शिपाई खास लक्षात राहिला. ऑल लाइन क्लियर, मोरूची मावशी, वासूची सासू, श्यामची मम्मी,जादू तेरी नजर.. बघता बघता सतीशच्या नाटकांची संख्या वाढतंच गेली. विनोदाचं अचूक टायमिंग शिकावं ते
सतीशकडूनच.. आणि सतीशनं प्रेक्षकांना लोटपोट हसवलं ते ‘फू बाई फू’मधून.. प्रत्येक पर्वात सतीश तारेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्यच केलं. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधला त्याचा गंभीर अभिनयही प्रेक्षकांना आवडला. पण सतीशचं रंगभूमीवरचं प्रेम काही कमी झालं नाही. म्हणून त्यानं ‘गोलगोजिरी’ नाटकाची निर्मिती केली. आणि त्याचं ते 100वं नाटक होतं. पण आयुष्याच्या रंगभूमीवरूनच अचानक त्याची झालेली एक्झिट मात्र अनेकांच्या डोळ्यात अश्रू देऊन गेली. IBN लोकमतची सतीश तारेला आदरांजली…

close