ब्लॉगमधून अडवाणींची मोदींवर स्तुतिसुमनं

January 18, 2009 9:15 AM0 commentsViews: 1

18 जानेवारी, मुंबईमोदींच्या कौतुकाची अडवाणींनी केली परतफेड आहे. अडवाणी यांनी त्यांच्या ब्लॉगमधून मोदींवर स्तुतिसुमनं उधळलीयत. अडवाणी यांनी मोदींना गेल्या 60 वर्षातील ते कर्तबगार नेता असल्याचं म्हटलंय. मोदी यांच्या कामातील सातत्याचीही अडवाणींनी ब्लॉगवर स्तुती केलीय. तसंच अडवाणी यांनी त्यांच्या दुसर्‍या पिढीतील नेत्यांवर स्तुतिसुमनं उधळलीयत. पण त्यांचा अप्रत्यक्ष कल मोदी यांच्याकडेच आहे. उद्योगपती अनील अंबानी आणि सुनील मित्तल यांनी नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी अडवाणी यांना दिलेल्या पाठिंब्याला महत्त्व आलं आहे.

close