महासदनाच्या बांधकामावर लोकलेखा समितीचे ताशेरे

July 3, 2013 7:48 PM0 commentsViews: 369

mahasadanनवी दिल्ली 03 जुलै : राज्याच्या लोकलेखा समितीने आज दिल्लीतल्या नव्या महाराष्ट्र सदनाची पाहणी केली. या पाहणीत लोकलेखा समितीने नव्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामावर ठपका ठेवला आहे. काही दिवसांपुर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते या सदनाचं उद्घाटन करण्यात आलं होतं.

मग हे सदन लगेच सुरु होणं गरजेचं होतं. पण ते झालं नाही हे गंभीर आहे या सदनाच्या बांधकामात शासनाचं नुकसान झाल्याचं लोकलेखा समितीचे म्हणणं आहे. तसंच या सदनाच्या बांधकामात कोणाला कसलं कंत्राट मिळालं, ते काम योग्य झालं की नाही याची चौकशी करणार असल्याचंही लोकलेखा समितीनं स्पष्ट केलंय. येत्या एका महिन्यात सदनाची सगळी काम पूर्ण करण्याचे आदेश समितीने दिले आहे. एका महिन्यानंतर कामाची पुन्हा एकदा पाहणी करणार असल्यांचही या समितीनं स्पष्ट केलंय.

close