26/11 च्या तपासात भारताला सहकार्य देणार : रेहमान मलिक

January 18, 2009 10:39 AM0 commentsViews: 5

18 जानेवारी, इस्लामाबादमुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा तपासाचा प्राथमिक रिपोर्ट दहा दिवसात, सादर करण्याचं आश्वासनं पाकिस्ताननं दिलं आहे. आतापर्यंत उडवाउडवीची उत्तर देणार्‍या पाकिस्ताननं आता सहकार्याची भूमिका घेतलीय. आत्तापर्यंत भारताने दिलेले पुरावे हे 'पुरावे नसून माहिती आहे' असं विधान पाकिस्तानकडून सातत्यानं केलं जात होतं. मात्र आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताच्या कठोर भूमिकेमुळं पाकिस्ताननं नरमाईचं धोरण स्वीकारलं आहे. भारतानं पाकिस्तानला हल्लाचे पुरावे देण्यासाठी 42 दिवसांचा वेळ घेतला. तेव्हा या हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारत, पाकिस्तानला पुरेसा वेळ देईल, अशी आशा रेहमान मलिक यांनी व्यक्त केली."आम्हाला तपासात कोणतीही घाई करायची नाही. त्यामुळे तपासात त्रुटी राहू शकतात. भारतानं दिलेल्या पुराव्यात तथ्य आढळल्यास आम्ही तसं भारताला कळवू आणि संयुक्त तपासाचा आग्रह धरू" असं रेहमान मलिक म्हणाले.

close