श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय क्रिकेट टीम जाहीर

January 18, 2009 10:45 AM0 commentsViews: 4

18 जानेवारीजानेवारीच्या अखेरीस होणार्‍या श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडविरुध्दच्या वनडे सीरिजमध्ये खेळलेलीच टीम एकदोन बदल करुन कायम ठेवण्यात आलीय.. आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणार्‍या रविंद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे. तर प्रविणकुमारनं पुन्हा एकदा टीममध्ये पटकावण्यात यश मिळवलंय.भारतीय टीमचा प्रमुख स्पीन बॉलर हरभजन सिंग मात्र या दौर्‍यात दिसणार नाही. दुखापतीमुळे हरभजनला विश्रांती देण्यात आली आहे. या सीरिजमध्ये 5 वन डे आणि एक ट्वेन्टी ट्वेन्टी मॅच खेळवण्यात येणार आहेत. यातली पहिली वन डे येत्या 28 तारखेला दम्बुलामध्ये रंगणार आहे. सीरिजमधल्या दोन वन डे दम्बुला तर उर्वरित तीन वनडे कोलंबोमध्ये रंगणार आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टी मॅच दहा फेब्रुवारीला कोलंबोत रंगणार आहे.

close