विम्बल्डनच्या गवतावरून पेटला वाद

July 3, 2013 9:51 PM0 commentsViews: 611

wimbaldan03 जुलै : विम्बल्डनची स्पर्धा अंतिम टप्प्यात असतानाच विम्बल्डनच्या गवतावरून वाद पेटला आहे. विम्बल्डनचं गवत धोकादायक असल्याची टीका टेनिसपटूंनी केली आहे. गेल्या बुधवारी एकाच दिवशी तब्बल सात सीडेड खेळाडूंनी दुखापतीचं कारण देत विम्बल्डनमधून माघार घेतली आहे.

ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर गेल्या 45 वर्षांत खेळाडूंनी माघार घेण्याची ही पहिलीच घटना आहे. विम्बल्डनमध्ये माघार घेणार्‍या खेळाडूंनमध्ये सहावा सीडेड जो विल्फ्रेड त्सोंगा, दहावा सीडेड मॅरीअन चिलीच, विम्बल्डनवर सर्वाधिक प्रदीर्घ वेळ मॅच खेळण्याचा विक्रम नावावर असणारा जॉन इस्नर, रॅडेक स्टेपनेक, यारोस्लोव्हा श्वेडोव्हा आणि महिलांमध्ये सातवी सीडेड व्हिक्टोरिया अझारेंका अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. नडालला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का देणार्‍या डार्सीयानंही या स्पर्धेतून माघार घेतली आहे. महिलांमध्ये दुसर्‍या सीडेड मारीया शारपोव्हानं आपल्या पराभवाचं खापर जाहिरपणे गवतावर फोडलंय. एकाच मॅचमध्ये मी तीनवेळा कोर्टवर पडल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का? असा सवालही तीनं यावेळी उपस्थित केला.

close