‘अ‍ॅथलेटिक्स’ला डोपिंगचं गालबोट, भारताची गोळाफेकपटू दोषी

July 3, 2013 10:00 PM0 commentsViews: 107

p udaylaxmiपुणे 03 जुलै : आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. पण स्पर्धेच्या सुरुवातीलाच डोपिंगचं ग्रहण लागलंय. भारताची एक गोळाफेकपटू डोपिंग प्रकरणी पॉझिटिव्ह आढळल्याचं कळतंय. या स्पर्धेत भारताच्या तीन गोळाफेकपटूंनी सहभाग घेतला आहे.

 

त्यापैकी एक अ‍ॅथलीट प्राथमिक चाचणीत दोषी आढळल्याची माहिती भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या अधिकार्‍यानं दिली. पी उदया लक्ष्मी ही उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळली आहे. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी नाडानं अ‍ॅथलीट्सची डोपिंग चाचणी घेतली होती. त्यात ही अ‍ॅथलीट दोषी आढळल्याचं कळतंय.

close