शाहरूख खानला पुत्ररत्न

July 3, 2013 9:17 PM0 commentsViews: 1416

srk03 जुलै : बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख आणि गौरी खान यांच्या घरी पुन्हा पाळणा हलणार यावरून बराच वाद रंगला होता अखेर या प्रकरणाला आता पुर्णविराम मिळाला आहे. सरोगसीद्वारे मुलाचा जन्म 27 मे रोजीच झालाची नोंद मुंबई महापालिकेनं केली आहे. त्यासंदर्भात तिसर्‍या बाळाचं जन्म प्रमाणपत्र मुंबई महापालिकेनं दिलं आहे.

 

या बाळाचा जन्म अंधेरीतल्या महिलांसाठी मसरानी हॉस्पिटलमध्ये झाला आणि त्यानंतर त्याला नानावटी आणि नंतर ब्रीच कैंडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आता या बाळाला घरी नेण्यात आलंय. खान कुटुंबीय या नव्या पाहुण्यासोबत रमले आहे. रुग्णालयाकडून जन्माची माहिती मिळल्यानंतर पालिकेकडून दाखला देण्यात येत असतो. मात्र या बाळाला जन्म देणारी स्त्री कोण होती हे अजून गुलदस्त्यातच आहे. मात्र या बाळाच्या जन्मापूर्वीचं हे सरोगेट मदरचं प्रकरण गाजलं होतं. या बाळाची गर्भलिंग निदान चाचणी केल्याचा आरोप करत ऍडव्होकेट आणि सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी आक्षेप घेतला होता. मात्र शाहरूख खानने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

close