रामलिंग राजू यांची चौकशी सुरू

January 18, 2009 10:50 AM0 commentsViews: 4

18 जानेवारी, हैदराबादसत्यममध्ये महाघोटाळा करणार्‍या रामलिंग राजू आणि त्याचा भाऊ श्रीनिवास यांना चंचलगुडा जेलमधून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांना डीआयजी ऑफीसमध्ये नेण्यात आलंय. तेथे त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. सत्यम घोटाळ्याची चौकशी आता सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टीगेशन ऑफिस करत आहे. सत्यमकडून काही फंड हा राजू परिवाराच्या मालकीच्या मेटास या कंपनीला देण्यात आल्याचं उघड झालंय. मेटासकडून हा पैसा आंध्रप्रदेशच्या काही स्थानिक संस्थांना मिळाल्याचीही माहिती हाती आली आहे. सत्यमशी संबंधित काही लोक आणि संस्थांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. सहा जणांची टीम ही चौकशी करत आहे. शनिवारी या महाघोटाळतल्या प्रमुख तीन आरोपींना, चार दिवसांची सीआयडी कस्टडी देण्यात आली होती. आतापर्यंत हे तिघे न्यायालयीन कोठडीत होते. सत्यममध्ये सात हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा केल्याची कबुली राजू आणि त्याच्या भावानं याआधीच दिली आहे.

close