भिवंडीमध्ये इमारत कोसळून 2 ठार

July 4, 2013 1:36 PM0 commentsViews: 183

bhivandi404 जुलै : मुंब्रा, नवी मुंबई येथील इमारत दुर्घटनेला महिनाही उलटत नाही पुन्हा एकदा आणखी इमारत कोसळण्याची घटना घडली आहे. भिवंडीमध्ये बुधवारी रात्री दोन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झालाय.

 

ढिगार्‍याखाली आणखी काही मृतदेह असल्याचा अंदाज आहे, तसंच काहीजण जिवंतही आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम एनडीआरएफ आणि अग्निशमन दलामार्फत सुरू आहे. आतापर्यंत 27 जणांना बाहेर काढण्यात यश मिळालंय. पहिल्या मजल्यावर सुरु असलेल्या बांधकामामुळे इमारत कोसळल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

close