‘जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर’

July 4, 2013 3:47 PM0 commentsViews: 1407

manikrao on jayavant patil04 जुलै : सांगली महापालिकेच्या प्रचारादरम्यान सध्या राज्यात सत्तेवर असलेल्या दोन मित्रपक्षांमध्ये हल्लाबोल सुरू आहे. ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना काँग्रेसच्या प्रवेशाचे वेध लागल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगलीत झालेल्या एका प्रचारसभेत केला.

यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासहीत जिल्ह्यातले सर्व नेते उपस्थित असल्यानं माणिकरावांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मुंबईत आल्या की जयंतराव त्यांच्याकडे पक्षात येण्याबाबत विचारणा करतात असा दावा माणिकरावांनी केला. मात्र जयंत पाटील यांनी मात्र माणिकरावांचा दावा सपशेल फेटाळलाय.आपण राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. सोनिया गांधींना आपण कधीही भेटलो नसल्याचा दावा पाटील यांनी आयबीएन लोकमतकडे केला.

close