सोपानकाकांच्या पालखीचं प्रस्थान

July 4, 2013 5:22 PM0 commentsViews: 129

04 जुलै : माऊलींची पालखी आज सासवड इथं मुक्कामी आहे. तर आजच्याच दिवशी ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू सोपानकाकांच्या पालखीचं प्रस्थान सासवडमधून ठेवण्यात येणार आहे. सासवडनगरी माऊली माऊलींच्या जयघोषानं दुमदुमून निघतेय. आज दिवसभर ठिकठिकाणी अन्नदान, आरोग्य तपासणी शिबिरं आणि वारकर्‍यांची जमेल तशी सेवा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सासवडकरांचा आजचा पाहुणचार घेऊन माऊली उद्या जेजुरीकडे प्रस्थान ठेवणार आहेत. तुकारामांच्या पालखीनं लोणी काळभोरचा मुक्काम आटोपून आज उरळी कांचन मार्गे यवतकडे प्रस्थान ठेवले.

close