कसाबच्या डीएनचे चाचणीचे नमुने पाकला देणार

January 18, 2009 12:15 PM0 commentsViews: 4

18 जानेवारी, मुंबईसुधाकर कांबळे भारतानं पाकिस्तानला आणखी काही पुरावे देण्याची तयारी सुरू केली आहे. कसाबच्या हातांचे ठसे आणि त्याच्या डीएनए चाचणीचे नमुने पाकिस्तानला दिले जाणार आहेत. कसाबबरोबर इतर 9 जणांच्या डीएनए चाचणीचे नमुनेही भारत पाठवणार आहे. कसाबचा जबाब महत्त्वाचा आहे. कसाबच्या जबाबचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पाठवलं पाकिस्तानात पाठवलं जाणारं आहे. कसाबनं 26 / 11च्या हल्ल्याची जी काही कबुली दिली आहे ती कबुली या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आहे. पण त्याचबरोबरीनं कसाबनं त्याच्यासोब तच्या 9 साथीदारांबद्दलची वर्णनासहीत सांगितलेली माहितीही त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगध्ये आहे. तसंच लष्कर ए तोयबाचे लाखवी आणि झराब शाह यांच नावही मुंबई हल्ल्याचे सूत्रधार म्हणून आरोपपत्रात टाकण्यात येणार आहे. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा तपासाचा प्राथमिक रिपोर्ट दहा दिवसात, सादर करण्याचं आश्वासनं पाकिस्ताननं दिलं आहे. आतापर्यंत उडवाउडवीची उत्तर देणार्‍या पाकिस्ताननं आता सहकार्याची भूमिका घेतलीये. आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताच्या कठोर भूमिकेमुळं पाकिस्ताननं नरमाईचं धोरण स्वीकारलंय. भारतानं पाकिस्तानला हल्लाचे पुरावे देण्यासाठी 42 दिवसांचा वेळ घेतला.तेव्हा या हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारत, पाकिस्तानला पुरेसा वेळ देईल, अशी आशा रेहमान मलिक यांनी व्यक्त केली.

close