पुण्यात सिंहगड रोडवर भरदिवसा हत्या

July 4, 2013 6:04 PM0 commentsViews: 2364

pune news04 जुलै : पुण्यात सिंहगड रोडवर भरदिवसा हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडालीय. सिंहगड रोडवर धायरी फाट्याजवळ दुपारी 12.30 च्या सुमारास अर्जुन घुलेंची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केलीय. अर्जुन घुले हे नांदोशी गावचे माजी सरपंच आहेत.

घुले यांच्यावर देशी कट्टा आणि कोयत्यानं हल्ला करण्यात आला. हत्येच्या ठिकाणाहून 2 गावठी पिस्तुलं सापडली आहेत. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

close