भाजपच्या संसदीय बैठकीला मोदी-अडवाणी एकत्र

July 4, 2013 11:03 PM0 commentsViews: 285

modi and advani04 जुलै : लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय.आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीत भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक झाली.

 

मोदींना प्रचार प्रमुख पद दिल्यामुळे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी चांगलेच नाराज झाले होते. या वादानंतर पहिल्यांदाच अडवाणी आणि मोदी समोरासमोर आले होते. दरम्यान, दिल्ली, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढसह पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवरही या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय. लोकसभा निवडणुकीचीही रणनीती यावेळी आखली जाण्याची शक्यता आहे.

close