इजिप्तमध्ये लष्करी उठाव, अध्यक्ष मोर्सी नजरकैदेत

July 4, 2013 11:08 PM0 commentsViews: 124

04 जुलै : इजिप्तमध्ये लष्करी उठाव करण्यात आला असून लोकशाही मार्गानं निवडून आलेलं पहिलं सरकार उलथून लावण्यात आलंय. यानंतर तिथं मोर्सी समर्थक आणि विरोधक यांच्यात उसळलेल्या संघर्षात आतापर्यंत 14 जण ठार झालेत. अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांना लष्करानं नजरकैदेत ठेवलंय.

मुस्लीम ब्रदरहूड या संघटनेनं या घडामोडींना दुजोरा दिलाय. मोर्सी यांची हकालपट्टी केल्यानंतर, नेतृत्वाची धुरा देशातल्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख ऍडली महमूद मनसूर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. इतिसंच पुढची निवडणूक होईपर्यंत देशाची राज्यघटनाही बरखास्त करण्यात आलीये. देशातल्या जनतेनं या घटनेचं संमिश्र स्वागत केलंय. कैरोमधल्या तहरीर चौकात मोर्सीविरोधी निदर्शकांनी जल्लोष केला.

तर लष्करी उठावानंतर पदच्युत अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात संघर्ष उफाळला. त्यामध्ये आतापर्यंत 32 जण ठार झालेत. इजिप्तमधल्या उठावाचा परिणाम विशेषतः सिरीयामध्ये होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसंच सुवेझ कालव्यामधून होत असलेल्या तेलाच्या वाहतुकीवर परिणाम होणार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरावर परिणाम होणार आहे.

close