एन्काउंटर फेम प्रदीप शर्मांची निर्दोष मुक्तता

July 5, 2013 3:47 PM0 commentsViews: 651

pradeep sharma305 जुलै : लखनभैय्या एन्काउंटर प्रकरणी एन्काउंटर फेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सेशन्स कोर्टाने प्रदीप शमांर्वरचे फेक एन्काउंटरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पण 13 पोलिसांना खून, खुनाचा कटाच्या आरोपांखाली कोर्टाने दोषी ठरवलंय.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा साथीदार असल्याच्या संशयावरून लखनभैय्या ऊर्फ रामनारायण गुप्ताचा 11 नोव्हेंबर 2006 रोजी
वर्सोवा येथील नाना-नानी पार्कजवळ एन्काउंटर केला. छोटा राजनसोबत संबंध असल्याचे अनेक पुरावे पोलिसांकडे होते. एवढेच नाही तर लखनवर गुन्हेही दाखल होते. मात्र एन्काउंटर होण्यापुर्वी लखनचं वाशीतून अपहरण करण्यात आलं असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळाली होती.

त्याचे भाऊ ऍड. रामप्रसाद गुप्ता यांनी मुंबई,ठाणे आणि नवीमुंबई पोलिसांना फॅक्सद्वारे लखनच्या जीवाला धोका आहे अशी माहिती दिली होती. मात्र ही माहिती मिळून सुद्धा लखनचं एन्काउंटर करण्यात आलं. लखनची हत्याच करण्यात आली असा दावा त्याचा कुटुंबीयांनी केली. त्यांनी न्यायालयात यासंबंधात याचिका दाखल केली. अंधेरी कोर्टाने लखनची हत्या करण्यात आली असं निरीक्षण होतं आणि पुढील निर्णयासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे अहवाल सुपूर्द केला. उच्च न्यायालयाने डॉ. गुप्तांचा तक्रार जबाब म्हणून नोंदवण्यात यावं आणि एसआयटी मार्फत चौकशीचे आदेश दिले. न्यायालयाच्या निर्णयानंतर एसआयटीने या प्रकरणी अपहरण,हत्या अशा गुन्ह्याची नोंद केली. यानंतर 7 जानेवारी 2010 रोजी एसआयटीने प्रदीप शर्मांसह 14 पोलिसांना अटक केली.

close