अश्विनी अकुंजी अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत खेळणार?

July 5, 2013 1:35 PM0 commentsViews: 106

ashwini05 जुलै : डोपिंगसंदर्भातील बॅन संपल्यानंतर भारतीय अ‍ॅथलीट अश्विनी अकुंजी पुन्हा एकदा धवण्याची शक्यता आहे. पुण्यात सुरु असलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये अश्विनी अकुंजी भाग घेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. अश्विनीवरची बंदी ही गुरूवारीच संपलीये.

 

अश्विनी ही भारताच्या 4 X 400 मीटर रिले टीमची प्रमुख अ‍ॅथलीट आहे. 2010 ला दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये अश्विनी अकुंजी आणि टीमनं गोल्ड मेडल पटकावलं होतं. त्यानंतर तिनं एशियन गेम्समध्येही गोल्ड पटकावलं होतं. पण त्यानंतर त्यांच्यावर डोपिंगची कारवाईही करण्यात आली होती. पण आता तिच्यावरची बंदी उठली आहे. त्यामुळे ती आता अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात आज संध्याकाळी निर्णय होणार आहे.

close