अडवाणी-भागवतांची बंद दरवाज्याआड चर्चा

July 5, 2013 1:04 PM0 commentsViews: 189

05 जुलै : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्याचं भाजपच्या नेत्यांचं सत्र सुरूच आहे. भाजपचे नाराज नेते लालकृष्ण अडवाणी यांनी नागपूरमध्ये भागवतांची भेट घेऊन बंद दरवाजाआड चर्चा केली. गुरूवारी मुरली मनोहर जोशींनी भागवतांची भेट घेतली होती, तर उद्या भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह भागवतांना भेटणार आहेत. लालकृष्ण अडवाणींच्या राजीनामा नाट्यानंतर भागवतांच्या भेटीचं सत्र सुरू झालंय. भाजपचे नेते नितीन गडकरी नागपुरात नसल्यानं ते या भेटींपासून दूर आहेत. भाजपच्या प्रचारप्रमुखपदी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची निवड झाल्यानंतर अडवाणींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी आपल्या सर्वपदांचा राजीनामा दिला होता. मात्र भागवतांच्या सुचनेनंतर अडवाणींनी माघार घेतली होती. गुरूवारी दिल्लीत भाजपची बैठक पार पडली. याबैठकीला वादानंतर अडवाणी आणि मोदी आमनेसामने आले होते. या बैठकीनंतर आज अडवाणींनी भागवतांची भेट घेतली.

close