माणिकरावांचं आता ‘नो कमेंट’

July 5, 2013 5:48 PM0 commentsViews: 308

मी कोणाच्या संपर्कात आहे की नाही, याचा निर्णय जनता करेल मला त्याची काही काळजी नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय. आज त्यांनी पक्षाध्यक्ष  सोनिया गांधींची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माणिकराव आतापर्यंत पवारांना कित्येकवेळा भेटलेत, कधी छुपेपणे, तर कधी उघडपणे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते छगनराव भुजबळ यांनी केली होती, त्यावर ठाकरेंनी उत्तर दिलं. तसंच जयंत पाटील यांच्याविषयी जे काही बोलायचं होतं ते सांगलीत बोलून झालं, आता प्रतिक्रिया देणार नाही असं ते एका प्रश्नाच्या उत्तरा दाखल म्हणाले.

close