कुर्ल्याच्या पोटनिवडणुकीत शांततेत मतदान

January 18, 2009 12:20 PM0 commentsViews: 4

18 जानेवारी, मुंबईमुंबई महापालिकेच्या वॉर्ड नंबर 160 मध्ये नगरसेवक पदासाठी आज मतदान झालं. कुर्ला नेहरूनगर भागात हा वॉर्ड येतो. शिवसेनेचे नगरसेवक शांताराम नाईक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. या वॉर्डमध्ये एकूण त्रेचाळीस हजार पाचशे मतदार आहेत. आज सुमारे पंचेचाळीस टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात येतंय. एकूण नऊ उमेदवार इथे रिंगणात आहेत. पण, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांमध्येच खरी लढत होईल. आज दिवसभर त्यामुळे कुर्ल्यात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

close