शेगावची कचोरी सातासमुद्रापार

July 5, 2013 9:03 PM0 commentsViews: 689

05 जुलै : शेगावच्या प्रसिद्ध चमचमीत आणि चटकदार कचोरीला आता आयएसओ 9001:2008 मानांकन प्राप्त झालंय. योगायोगानं या कचोरीचा आज 63 वा वाढदिवस आहे. पुण्यातले उद्योजक अविनाश देव यांच्या सहकार्याने अमेरिकेतल्या न्यू यॉर्कमध्ये ही कचोरी आता पोहोचली आहे. अमेरिकेत 300 ठिकाणी ही कचोरी लवकरच मिळणार आहे. दुबईतील एका हॉटेल समूहानेही शेगाव कचोरीसाठी दुकानाचे मालक गगन शर्मा यांच्याशी नुकताच करार केलाय. आठवडाभर खराब होणार नाही अशा पद्धतीने परदेशात जाणारी कचोरी बनणार आहे.

close