हत्तींना साखळदंडाची शिक्षा?

July 5, 2013 9:07 PM0 commentsViews: 164

AUR_ZOO_ELEPHANT305 जुलै : जखमी अवस्थेत आढळलेल्या हत्तीणीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत ताजी असताना औरंगाबादमधला महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालायात दोन हत्तींवर अत्याचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. प्राणीसंग्रहालयातील सरस्वती आणि लक्ष्मी यांना साखळदंडानं बांधून ठेवलंय.

 

मागचा एक आणि पुढचा एक पाय साखळदंडानं बांधल्यानं दोघींनाही हालचाल करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम झालाय. झू अथॉरिटीच्या निर्देशानुसार प्राणीसंग्रहालायात नर आणि मादी अशी जोडी ठेवावी लागते. आणि त्यांना साखळदंडानं बांधून ठेवता येत नाही. 2001 साली याच प्राणीसंग्रहालयात निष्काळजीपणामुळे शंकर नावाच्या हत्तीचा मृत्यू झाला होता. झू अथॉरिटीनं प्राणीसंग्रहालयाला पत्र पाठवून हत्तींना नैसर्गिक वातावरणात ठेवता येत नसेल तर विशाखापट्टणमला पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र त्यावर अजूनही अंमलबजावणी झालेली नाही.

close