झिंम्बाब्बे दौर्‍यासाठी गंभीर टीमबाहेर,रसूलला संधी

July 5, 2013 10:01 PM0 commentsViews: 780

parevezh rasul05 जुलै : झिंम्बाब्बेमधल्या पाच मॅचच्या सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोणीला दुखापतीमुळे आराम देण्यात आलाय आणि त्याच्याजागी विराट कोहलीला कर्णधारपद देण्यात आलंय. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मोहित शर्मा आणि जयदेव उनाडकटला टीममध्ये सामिल करण्यात आलंय तर गौतम गंभीर, इशांत शर्मा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि आर अश्विन यांना वगळण्यात आलंय. परवेज रसूल हा राष्ट्रीय संघात सामिल होणारा जम्मू काश्मीरमधला पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
अशी असेल टीम

विराट कोहली (कर्णधार) शिखर धवन,चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मोहित शर्मा, जयदेव उनाडकट,परवेज रसूल, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, अमित मिश्रा,शहीद अहमद

close