कल्याणसिंग-मुलायमसिंग भेट

January 18, 2009 5:25 PM0 commentsViews: 1

18 जानेवारी, दिल्लीनिवडणुकीपूर्वी भाजपपुढच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कल्याणसिंग यांनी आज समाजवादी पार्टीचे मुलायसिंग यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. दिल्लीत ही भेट झाली. उत्तरप्रदेशात भाजपनं केलेल्या तिकीट वाटपाबाबत कल्याणसिंग नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसातही त्यांनी पक्षाच्या धोरणांबद्दल जाहीररित्या नाराजी व्यक्त केली आहे.

close