झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट

January 19, 2009 5:05 AM0 commentsViews: 5

19 जानेवारी, दिल्लीझारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. पण झारखंड विधानसभा मात्र भंग करण्यात आलेली नाही. शिबु सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर, तेथे मुख्यमंत्री कोणाला करायचं यावर एकमत होत नाहीये. त्यामुळं राज्यपालांच्या सुचनेवरूनतेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.शिबु सोरेन यांचा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. झारखंडमध्ये काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा यांचं संयुक्त सरकार आहे. या तिन्ही पक्षात मुख्यमंत्रीपदावरून बरेच वाद आहेत. शिबु सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदासाठी चंपाई सोरेन यांचं नाव सुचवलं. मात्र काँग्रेस आणि राजदला हे मान्य नव्हतं. काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केलं गेलं, मात्र त्याला शिबु सोरेन यांची पसंती मिळू शकली नाही.झारखंड निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे सामोपचारानं मार्ग काढण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न चालू आहे. विधानसभा भंग केली गेली नाही, तर निलंबित करण्यात आली आहे. त्यामुळे या विषयावर आज तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होण्याची अपेक्षा आहे. मधू कोडा आणि लालू प्रसाद यादव दिल्लीत पोहोचले आहेत. शिबु सोरेन देखील आज दिल्लीत येतील, असा अंदाज बांधला जात आहे.

close