हॉस्पिटलमध्ये अस्वच्छतेमुळे समिधाचा मृत्यू

July 5, 2013 10:16 PM0 commentsViews: 558

samidha khandare05 जुलै : कामाचा व्याप आणि वस्तीगृहातल्या अस्वच्छतेमुळे डॉ. समिधा खंडारे (वय 24) हीचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. मुंबईतल्या सायनच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस करत असताना ती इन्टर्नशिप करत होती. हॉस्पिटलमधल्या वसतीगृहातली अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाचं अन्न यामुळे समिधा आजारी पडली आणि तीला टीबी झाला.

कामाचा व्याप आणि अभ्यासाचा ताण यामुळं ती आपल्या आजाराकडं लक्ष देऊ शकत नव्हती. डॉक्टर दिनाच्या पुर्वसंध्येला समिधाची प्राणज्योत मालवली. डॉक्टर होऊन रूग्णसेवा करण्याचं समिधाचं स्वप्न भंग पावलं असून तीचं हे बलिदानच असल्याची भावना तिचे कुटुंबीय व्यक्त करत आहेत. अकोला जिल्ह्यातल्या मुर्तीजापूर इथं सोमवारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. समिधा खंदारेंचं निधन झाल्यामुळे निवासी डॉक्टरांच्याच आरोग्याचा गंभीर प्रश्नं निर्माण झालांय. मार्डच्या डॉक्टरांनी या संदर्भात पत्रकार परीषद घेऊन निवासी डॉक्टरांचे प्रश्नं मांडले. महाराष्ट्रात सध्या वीसहुन अधीक डॉक्टरांना वेगवेगळे आजार झाल्याचं मार्डच्या डॉक्टरांनी सांगितलंय.

close