‘आगामी निवडणुका संघाला सोबत घेऊनच’

July 5, 2013 7:58 PM0 commentsViews: 290

Image img_178312_advanionanna_240x180.jpg05 जुलै : भाजप आगामी निवडणुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सोबत घेऊनच लढणार असल्याचं भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत नागपुरातल्या संघ मुख्यालयात दिवसभराच्या बैठकीनंतर अडवाणी बोलत होते.

मोहन भागवत यांच्यासोबतची बैठकीनंतर आपण समाधानी असल्याची प्रतिक्रियाही अडवाणींनी दिली आहे. गुरवारी भाजपचे जेष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली तर उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग हे भागवतांची नागपुरात भेट घेणार आहेत. भाजपच्या या तिन्ही जेष्ठ नेत्यांनी स्वतंत्रपणे मोहन भागवत यांच्याशी भेट घेतल असल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क लावले जात आहेत. दरम्यान, नितिन गडकरी परदेशात असल्याने त्यांची भेट अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी घेवू शकले नाही.

भाजपच्या प्रचारप्रमुखपदी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची निवड झाल्यानंतर अडवाणींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी आपल्या सर्वपदांचा राजीनामा दिला होता. मात्र भागवतांच्या सुचनेनंतर अडवाणींनी माघार घेतली होती. गुरूवारी दिल्लीत भाजपची बैठक पार पडली. याबैठकीला वादानंतर अडवाणी आणि मोदी आमनेसामने आले होते. या बैठकीनंतर आज अडवाणींनी भागवतांची भेट घेतली.

close