कसाबला 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

January 19, 2009 7:09 AM0 commentsViews: 1

19 जानेवारी , मुंबईसुधाकर कांबळे मुंबईच्या 26/11तल्या हल्ल्यातील आरोपी मोहम्मद अजमल कसाब याच्या पाचव्या गुन्ह्याची सुनावणी झाली. ही सुनवाई सीएसटी स्टेशनमधल्या पहिल्या हल्ल्याबाबत होती. या गुन्ह्यात कसाबला 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. कसाबवर एकूण 12 गुन्ह्याची नोंद आहे. त्या 12 गुन्ह्यांपैकीच्या एका गुन्ह्याची सुनावणी आज होणार होती. आतापर्यंत कसाबवरच्या पाच गुन्ह्यांची सुनावणी झाली आहे. कसाबवर एकूण 12 गुन्हे आहेत. या 12 गुन्ह्यांपैकी चार गुन्ह्यांची सुनावणी आधीच झाली आहे. व्हीटी स्टेशनमधला हल्ला, स्कोडा गाडी चोरी प्रकरण, रंगभवनजवळ एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर आणि त्यांच्या इतर सहका-यांची हत्त्या करणं अशा चार प्रकारणांमध्ये कसाबची सुनावणी झालेली आहे. आता पाचव्या गुन्ह्याचीही सुनावणी झाली आहे. उरलेल्या सात गुन्ह्यांची सुनावणी व्हायची आहे. त्या सात गुन्ह्यांमध्ये नरिमन हाऊस, ताज हॉटेल, हॉटेल ऑबेराय इथल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. ही सुनावणी क्राइम ब्रान्चमधल्या लॉकअपमध्ये झाली. या सुनावणीमध्ये क्राइम ब्रान्चचे अधिकारी, क्राइम ब्रान्चमधल्या कोर्टाचे न्यायाधीश, सरकारी वकील यांचा समावेश होता.

close