राष्ट्रवादीच्या नेत्याने उघडपणे वाटले पैसे

July 6, 2013 5:23 PM3 commentsViews: 1964

sangli ncp_4306 जुलै : सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते इब्राहिम चौधरी यांच्याकडून मतदारांना पैशाचे उघड वाटप करण्यात आल्याचं उघड झालंय. आचारसंहिता भंग करणार्‍या इब्राहिम चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची काँग्रेस उमेदवारांनी मागणी केलीय.

चौधरी यांचा मुलगा जुबेर चौधरी हा वॉर्ड क्रमाक 8 मधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभा आहे. आज इस्त्राईलमगर परिसरात इब्राहिम चौधरी आले होते. त्यांनी एका महिला मतदाराला पाचशे रुपये दिले आणि वॉर्ड क्रमांक 7 मधल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करायला सांगितले.

त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस उमेदवारांनी केली आहे. या अगोदरच इब्राहिम चौधरी यांना अपात्र ठरवण्यात आलंय. महापालिकेच्या इमारतीवर झालेल्या दगडफेक प्रकरणात त्याना 6 महिने सक्त मजुरी आणी पाच हजार रूपये दंडाची शिक्षा झाली होती.

 • राज

  राष्ट्रवादी पक्षाची निवडणूक लढवण्याची लायकी नाही.वागळे तुमचे तोंड आता का बंद आहे.

 • Tambday Rohit

  शरद पवार साहेब आपण असल्या फालतू गोष्टी बंद करण्यासाठी काही inernal control systemतयार करा, नाहीतर आमच्या जनतेच्या मनात एकाच विचार घुटमळत राहील ” हि पार्टी राष्ट्रवादी नाहीतर फक्त आणि फक्त पैसावादी आहे” आणि त्याचे परिणामही कदाचित फार वाईट होतील एकतर महाराष्ट्रावर किंवा आपल्या पक्षावर.

  • Suraj Gawali

   janta Mhanje kay tambday rohit samjla ki kay ,,,,,mhane jantechya manat ghutmalat rahil………………………..

close