भाजपनं पुन्हा आळवला राममंदिराचा राग

July 6, 2013 2:37 PM1 commentViews: 318

amit saha06 जुलै : भाजपनं पुन्हा एकदा राममंदिराच्या मुद्द्याला हात घातलाय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे विश्वासू आणि भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा यांनी आज अयोध्येला भेट दिली. आणि राममंदिराच्या वादाला पुन्हा एकदा तोंड फोडलं. भाजप लवकरच अयोध्येत भव्य राममंदिर बांधेल असं त्यांनी सांगितलं. या अगोदरही प्रत्येक निवडणुकींच्या वेळी भाजपच्या नेत्यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केलाय. तर भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मागील वर्षी रथ यात्रा काढली होती. मात्र 2014 च्या भाजपच्या प्रचारमोहिमेची सूत्रं नरेंद्र मोदींनी हाती घेतली आहे आता राममंदिराचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून निवडणुकीत चमत्काराची भाजपची अपेक्षा आहे.

  • rohit dhale

    yaat navin kahi nahi.yacha kahi fayada bjp la honar nahi

close