राजनाथ सिंह भागवतांच्या भेटीला

July 6, 2013 2:54 PM1 commentViews: 91

rajnath sing06 जुलै : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींपाठोपाठ पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह आज सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्यासाठी नागपूरमध्ये दाखल झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरच्या मुख्यालयात त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. शुक्रवारी लालकृष्ण अडवाणींनी सरसंघचालकांची भेट घेतली होती. भाजप आगामी निवडणुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सोबत घेऊनच लढणार असल्याचं अडवाणी यांनी स्पष्ट केलं होतं. भाजपचे जेष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनीही याआधी मोहन भागवत यांची भेट घेतली होती.

  • Vijay Sonawane

    good

close