एलटीटीईचा प्रमुख प्रभाकरन श्रीलंकेतून निसटला

January 19, 2009 7:10 AM0 commentsViews: 5

19 जानेवारी, श्रीलंकाएलटीटीईचा प्रमुख प्रभाकरन श्रीलंकेबाहेर पळून गेल्याची माहिती श्रीलंकन लष्करप्रमुख शरथ फोन्सेका यांनी दिली आहे. श्रीलंकन सैन्यानं मुलैतिवू या एलटीटीईच्या बालेकिल्ल्याची कोंडी केली असली तरी प्रभाकरन मात्र त्यांच्या हाती लागलेला नाही. किलीनोच्ची आणि एलिफंटपास ताब्यात घेतल्यानंतर आता लढाई आणखीन तीव्र झाली आहे. एलटीटीईचा प्रतिकार कमी होत असून त्यांच्याकडे जेमतेम 1000 सैनीक उरले आहेत. लवकरच एलटीटीईचा पूर्ण बीमोड करू, असा विश्वास श्रीलंकन लष्करप्रमुखांनी व्यक्त केला.एलटीटीई चा प्रमुख प्रभाकरन यांनी लपण्यासाठी तळघर बनव होतं. मात्र त्याचा वापर करण्यापूर्वीच श्रीलंकन सैन्यानी धरमपूरम भागावर ताबा मिळवला. हे तळघर भरवस्तीत आणि गरीब लोकांच्या घराजवळ आहे.त्याचं प्रवेशव्दार एका झोपडीत आहे. तर एका कंटेनरमध्ये एअरकंडिशन मशीन असून ते तळघराच्या प्रवेश दाराशी ठेवण्यात आलं आहे.

close