महाप्रलयात जळगावचे सुधीर अजूनही बेपत्ता

July 6, 2013 1:31 PM0 commentsViews: 284

06 07 2013  SATURDAY  01  006 जुलै : उत्तराखंडातल्या महाप्रलयात गेल्या 19 दिवसांपासून अडकून पडलेला अंमळनेरचा सुधीर पाटील अजुनही बेपत्ता आहे. ज्या दिवशी महाप्रलय आला त्याच दिवशी सुधीरनं आपल्या आईला फोन करून सांगितलं होतं की, मी बद्रीनाथमध्ये एका डोंगरावर सुरक्षित आहे. मात्र त्यानंतर त्याचा संपर्कच होऊ शकलेला नाही. सुधीर हा विवाहीत असून केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये तो गाईडचं काम करत होता. गेल्या तीन महिन्यांपासून तो कामानिमित्तानं घराबाहेरच होता. दरम्यान या काळात त्यांना पुत्ररत्न झाला पण बद्रीनाथमध्ये अडकलेल्यामुळे आपल्या मुलाचं तोंड सुद्धा अजून बघितलं नाही. त्याची आई आणि पत्नी काळजीत आहेत. मात्र सरकारने महाराष्ट्रातील यात्रेकरूंना वाचवण्यात आलंय. जे अडकले आहे त्यांचा शोध सुरू आहे असं स्पष्टीकरण दिलंय. तर 15 जुलैपर्यंत जे अडकलेले यात्रेकरू परत येणार नाही त्यांनी मृत घोषित केलं जाईल असं उत्तराखंड सरकारने स्पष्ट केलंय.

close