नागपूर पोटनिवडणुकीत भाजपचे अशोक मानकर विजयी

January 19, 2009 6:17 AM0 commentsViews: 1

18 जानेवारी, नागपूरनागपूर विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपचे अशोक मानकर विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या अनंतराव घारड यांचा पराभव केलाय. सागर मेघेंच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिकामी झाली होती. नितीन गडकरी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती.सागर मेघे यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं ही पोटनिवडणूक झाली. यात अशोक मानकर 37 मतांनी निवडून आले. काँग्रेसचे उमेदवार अनंत घारड हे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत तर अशोक मानकर हे नितीन गडकरी यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. त्यामुळे ही फक्त पोटनिवडणूक न रहाता दोन मातब्बर राजकीय नेत्यांमधली लढाई झाली होती.

close