नेत्याचं पैसे वाटप

July 6, 2013 7:30 PM0 commentsViews: 1029

06 जुलै : सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते इब्राहिम चौधरी यांच्याकडून मतदारांना पैशाचे उघड वाटप करण्यात आल्याचं उघड झालंय. आचारसंहिता भंग करणार्‍या इब्राहिम चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची काँग्रेस उमेदवारांनी मागणी केलीय.

चौधरी यांचा मुलगा जुबेर चौधरी हा वॉर्ड क्रमाक 8 मधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभा आहे. आज इस्त्राईलमगर परिसरात इब्राहिम चौधरी आले होते. त्यांनी एका महिला मतदाराला पाचशे रुपये दिले आणि वॉर्ड क्रमांक 7 मधल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करायला सांगितले.

त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस उमेदवारांनी केली आहे. या अगोदरच इब्राहिम चौधरी यांना अपात्र ठरवण्यात आलंय. महापालिकेच्या इमारतीवर झालेल्या दगडफेक प्रकरणात त्याना 6 महिने सक्त मजुरी आणी पाच हजार रूपये दंडाची शिक्षा झाली होती.

close