मनसेची उत्तर भारतीयांविरुद्ध बॅनरबाजी

January 19, 2009 7:21 AM0 commentsViews: 5

19 जानेवारी, मुंबईपुन्हा एकदा बॅनरबाजी करत मनसेनं उत्तरभारतीयांना विरोध केला आहे. येत्या 24 जानेवारीला असलेला उत्तर प्रदेश दिन लक्षात घेऊन मनसेनं मुंबईच्या गिरणगावात ही बॅनरबाजी केली आहे. मुंबईतल्या गिरणगावात एका बॅनरच्या माध्यमातून मनसेनं उत्तर प्रदेश दिनाचं निमित्त करून राज्यात महाराष्ट्र दिनाशिवाय दुसर्‍या कोणत्याही राज्याचा दिवस साजरा केला जाणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे. 24 जानेवरीला असलेल्या उत्तर प्रदेश दिनाचं निमित्त साधून मनसेनं हा धमकीवजा इशारा दिला आहे.

close