जात पंचायतीविरोधात महामोर्चा

July 6, 2013 8:42 PM0 commentsViews: 124

nasik morcha नाशिक 06 जुलै : जात पंचायतीच्या अत्याचाराविरोधात सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला. आंतरजातीय विवाह करणार्‍यांवर अत्याचार करणार्‍या कुडमुडे जोशी समाजाच्या सहा पंचांना पोलिसांनी अटक केलीय. पण त्यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी चुकीची कलमं लावल्याची तक्रार मोर्चेकर्‍यांनी केलीय. त्यांच्याविरोधात मारहाणीस प्रवृत्त करणं, दंडाच्या नावानं खंडणी उकळणं असे गुन्हे नोंदवण्यात आलेत. पण सामाजिक बहिष्काराच्या विरोधात असणारी कलमं लावण्यात आलेली नाहीत, असा आरोप केला जातोय.

close