जिल्हाधिकार्‍यांच्या बदलीविरोधात उत्स्फुर्त भंडारा बंद

July 6, 2013 8:59 PM0 commentsViews: 396

06 जुलै : भंडारा जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सचिंद्र कुमार सिंह यांची बदली केल्यामुळे नागरिकांनी आज उत्स्फुर्त बंद पाळलाय. सिंग यांनी एका वर्षात अनधिकृत बांधकामं पाडली, कॉपी मुक्त आंदोलन सुरु केलं. त्यामुळे राजकीय दबावामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोप होतोय. याविरोधात जिल्हयातील नागरीक, शाळा आणि महाविद्यालयातील विद्याथीर्ंनी स्वाक्षरी मोहीम राबवली. अनेक ठिकाणी रास्तारोको आंदोलनं करण्यात आली.

close